ऑस्ट्रेलियातही १०० डॉलर नोटबंदीची योजना

100doll
भारताने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जगभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच ऑस्ट्रेलियानेही भ्रष्टाचार व काळा पैसा यांवर नियंत्रण आणण्यासाठी तेथील चलनातील सर्वात मोठ्या मूल्याची १०० डॉलर्सची नोट चलनातून रद्द करण्याची योजना आखली असल्याचे समजते. ऑस्ट्रेलियाच्या महसूल व अर्थ मंत्री केली ओ द्वायर यांनी असे संकेत दिले आहेत.

अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार कांही ठराविक रकमेपलिकडे १०० डॉलर्स च्या नोटांमध्ये जे कॅश व्यवहार केले जात आहेत त्यावर आमची नजर आहे. या नोटा बंद केल्यामुळे अब्जाधीश जी करचोरी करत आहेत त्याला आळा घालता येणे शक्य होईल. देशात सध्या २१ अब्ज डॉलर्सची कॅशव्यवस्था आहे व ती संपुष्टात आणण्यासाठी सरकारने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला आहे. देशात सध्या पाच डॉलरच्या नोटांचा जितका वापर होतो आहे त्याच्या तिप्पट प्रमाणात १०० डॉलर्स नोट वापरात आहे. याचा परिणाम काळा पैसा वाढण्यात होत आहे.

भारतानंतर द. अमेरिकेतील व्हेनेझुएलानेही मोठ्या नोटा चलनातून रद्द केल्या जात असल्याची घोषणा करून १०० बॉलीवर मूल्याची नोट बंद केली आहे.

Leave a Comment