स्क्रीनवर बोट फिरवून चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी

swipe
स्मार्टफोन युजरला वारंवार चार्ज करावी लागणारी बॅटरी हा मोठाच अडथळा असतो.बॅटरी चार्ज करायची तर चार्जर बाळगा, किंवा वायरलेस चार्जर घ्या शिवाय वीज कनेक्शन शोधा हे व्याप आलेच. घरच्याघरी बॅटरी चार्ज करण्यात इतकी अडचण येत नाही मात्र प्रवासात किंवा घराबाहेर असताना स्मार्टफोनची बॅटरी डिसचार्ज होणे फारच कटकटीचे होते. युजरची ही डोकेदुखीही संपण्याचा मार्गावर आहे. स्क्रीनवरून नुसते बोट फिरविले की बॅटरी चार्ज होऊ शकेल असे तंत्रज्ञान लवकरच येत आहे.

या तंत्राला नॅनो जनरेटर तंत्रज्ञान असे नाव असून यापूर्वीही या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. हे तंत्रज्ञान वापरून अशी पादत्राणे बनविली गेली आहेत की ज्यात तुम्ही चालाल त्या प्रमाणात वीज निर्माण होऊन ती साठविली तर १० वॅटचा एलईडी बल्ब पूर्ण दिवस प्रकाश देतो हे सिद्ध झाले आहे. या उर्जेवर मोबाईल चार्जही करता येतात. मात्र याच तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टफोनचा स्क्रीन बोटांनी स्वाईप केल्यास बॅटरी चार्ज करता येऊ शकते हे आता लक्षात आले आहे. स्वाईप करण्यातून निर्माण झालेली उर्जा साठविण्यासाठी कागदासारख्या पातळ शीट बनविण्याचे प्रयत्न सुरू असून अशा शीट बनल्यावर हे तंत्रज्ञान वापरात आणले जाईल असे समजते.

Leave a Comment