सावधान ! ताबडतोब डिलिट करा स्मार्टफोनमधील हे चार अॅप

mobile-apps
नवी दिल्ली – आजच्या जमान्यात स्मार्टफोन आल्यापासून अनेक कामे करणे खुपच सोयीस्कर झाले असून विविध माहिती गोळा करणे, अनेक प्रकारचे गेम्स खेळणे, संगीत ऐकणे, शिक्षणांशी किंवा अन्य काही माहिती गोळा करणे अॅपच्या माध्यमातून सहज शक्य झाले आहे. पण केंद्रीय गृहमंत्रालयाने आता स्मार्टफोनमधून चार अॅप तातडीने डिलिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

या चार अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी यंत्रणा महत्वाची माहिती गोळा करत असल्याचे समोर आले आहे. या अॅपच्या माध्यमातून मालवेअर व्हायरस पाठवून पाकिस्तानी एजन्सी हेरगिरी करत असल्याचे ठोस अहवाल गृह मंत्रालयाला मिळाले आहेत.

हे आहेत ४ अॅप्स १) एमपीजंक (म्यूजिक अॅप), २) टॉकिंग फ्रॉग (एंटरटेन्मेंट अॅप), ३) टॉप गन (गेम अॅप), ४) व्हिडीजंक (व्हिडिओ अॅप)

Leave a Comment