तीन आठवड्यात मुबलक नोटा होणार उपलब्ध

arun-jaitley
नवी दिल्ली – देशात नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या चलन टंचाईवर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक पुरेशा नोटांचा पुरवठा लवकरच करणार असून रिझर्व्ह बँक दररोज मोठ्या संख्येंने नोटांचा पुरवठा बँकांना करत आहे. त्यामुळे येत्या ३ आठवड्यात अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात नोटांचा पुरवठा होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

जेटली यावेळी बोलताना म्हणाले, की विना हिशोबी पैसे नोटाबंदीमुळे बँकिंग सिस्टमच्या बाहेर जात आहे. त्यांनी नोटाबंदीला ‘डिजिटाईजेशन’ला मदत करणारे पाऊल असल्याचेही सांगितले. यामुळे भविष्यात सर्व व्यवहार डिजिटल होणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment