अबब! ३३ कोटी रूपयांची ट्रॅव्हीटा कार

trevita
कोयनिगसेग सीसीएक्सआर ट्रॅव्हिटाची जगातली सर्वात महागडी कार किती रूपयांची असेल याचा कांही अंदाज येतोय? नाही? मग ऐका ही कार तब्बल ३२ कोटी ४३ लाख रूपये किमतीची असून अशा फक्त तीनच कार कंपनीने बनविल्या आहेत. जगातली ही पहिली ग्रीन सुपरकार(पर्यावरणाला अजिबात हानी न पोहोचविणारी) असल्याचे सांगितले जाते. यात कार्बन फायबरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे.

कमी संख्येने कार बनविल्याने त्याची किंमतही वाढली आहे मात्र ही कार आहे एकदम खास. तिला कोयनिगसेग व्ही आठ ड्राय सम्प लुब्रिकेशन इंजिन दिले असून हे इंजिन ४८०० सीसीचे आहे. ऑप्शनल पॅडल शिफ्टसह सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, ड्युएल क्लच अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. ही कार ० ते १०० किमीचा वेग २.८ सेकंदात घेते व ०ते २०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला ८ सेकंद लागतात. कारचा टॉप स्पीड आहे ताशी ४१० किमी.

Leave a Comment