रिलायन्स जिओने भारतात आणला पोकेमॉन गो

rejio
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जगभरातील लोकांना वेड लावलेला पोकेमॉन गो हा खेळ भारतात आणला आहे. त्यासाठी कंपनीने द पोकेमॉन कंपनी व निअॅटिक बरोबर भागीदारी करार केला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. निअॅटिकने जगभरात धूम माचविणारा ऑगमेंडेड रिअॅलिटी गेम पोकेमॉन गो तयार केला आहे.

जिओ सिम वापरणारे युजर हा गेम खेळू शकणार आहेत व जिओच्या हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत त्यासाठी युजरला डेटा चार्ज द्यावा लागणार नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअर्स, जिओ रिटेल लोकेशन्स व चार्जिग स्टेशन या गेममध्ये खेळणार्‍यांना पोकेस्टॉप्स व जिम्सच्या रूपात दिसतील. आजपासून म्हणजे १४ डिसेंबरपासूनच जिअ्रो ग्राहक हा खेळ खेळण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. तसेच जिओचॅट मध्ये प्लेअर पोके गो चॅनलही अॅक्सेस करू शकणार आहेत.

Leave a Comment