दोन भारतीयांचा अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत समावेश

combo
न्यूयॉर्क – फोर्ब्स दरवर्षीप्रमाणे ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अमेरिकी व्यावसायिकांची यादी जाहिर करते. यावर्षी या यादीत २ भारतीय वंशांच्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग सर्वोच्च स्थानी असून, त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर आहे. तर, बायोटेक व्यावसायिक विवेक रामास्वामी या यादीत २४व्या स्थानी, तर अपूर्व मेहता ३१व्या स्थानी आहेत. रामास्वामी यांची संपत्ती ६०० दशलक्ष डॉलर, तर मेहता यांची संपत्ती ३६० दशलक्ष डॉलर आहे.

Leave a Comment