३ दिवसानंतर पुन्हा बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

atm
मुंबई: देशभरात नोटबंदीच्या निर्णयानंतर सुरू झालेला चलनकल्लोळ अद्यापही थांबालेला नसून. बॅंका त्यातच सुरूवातीचे काही दिवस वगळता नियमाप्रमाणे सुटी घेऊ लागल्यामुळे जनतेला मात्र नियमाप्रमाणे चलन मिळणे मुश्किल झाले आहे. त्याचा प्रत्यय आज देखील येत आहे. मागील तीन दिवसांपासून बंद असलेल्या बॅंका आज सुरू झाल्या आहेत. बँक सुरू व्हायला प्रत्यक्षात अवधी असला तरी, सकाळपासूनच नागरिकांनी पैशासाठी बॅंकांच्या दारात हजेरी लावली आहे. त्यामुळे बॅंकांसमोर लांबच लांब रांगा दिसत आहेत.

पैशाची अड़चण नसल्याचा दावा सरकार वारंवार करते. मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती दिसत नाही. शहरी भागातील बहुतांश एटीएम बंद आहेत. अपवादात्मक स्थितीत एखादे सुरू आहे. मात्र, त्यापूढेही रांगा आहेत. त्यातच सुरूवातीच्या काही काळात एटीएममधून शंभर रूपयांच्या नोटा आल्या. मात्र, आता जी एटीएम अपवादाने सुरू आहेत त्यातून थेट २ हजारांचीच नोट निघत असल्यामुळे ग्राहकांपूढे पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे की, पैसे सुट्टे कसे करायचे. त्यातच केवळ मुंबई, पुणे असो किंवा विदर्भ आणि मराठवाडा कुठल्याही एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे अर्थातच लोकांना खऱ्या अर्थी कॅशलेस झाल्याचा अनुभव येत आहे.

Leave a Comment