श्रीमंत शेतकर्‍यांसाठी लग्झरी ट्रॅक्टर

tracto
बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज अशा लग्झरी कार बाळगण्याचा व त्यातून प्रवास करण्याचा शौक अनेकांना असतो. ज्यांना लग्झरी ड्रायव्हिंगचा शौक आहे व रोजचे काम करतानाच त्यांना हा शौक पुरविता येईल अशा श्रीमंत शेतकर्‍यांसाठी फिएट क्रिसलर कंपनीची सिस्टर कंपनी सीएनएच ने एसयूव्हीला मागे टाकेल असा ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. २०१७ आयएच ऑप्टिम २७० सीव्हीएक्स अशा भल्यामोठा नावाने आलेल्या या भल्या मोठ्या ट्रॅक्टर ची किंमतही भली मोठी आहे. या ट्रॅक्टर साठी ग्राहकाला १ कोटी ६९ लाख रूपये मोजावे लागणार आहेत.

विज्ञान संशोधनासह लग्झरी व शौक यांचे मिश्रण असलेला हा ट्रॅक्टर २४२०० पौंड वजनाचा असून तो एखाद्या बुलडोझरसारखा दिसतो. डिझेलवर चालणार्‍या या ट्रॅक्टर चे इंटीरिअर अतिशय मस्त व आरामदायी आहे. इतकेच नव्हे तर तरूणींनाही तो फारच पसंत पडला आहे. शेतात काम करताना चारी बाजूंनी धूळ असली तरी या ट्रॅक्टर च्या आत धुळीचा मागमूसही नसतो. याचे रूपरंग, आवाज व आकार रोमांचकारी आहे. त्याला ६.७ लिटरचे टर्बो डिझेल इंजिन, ड्युअल क्लच गिअर सेट, लॉटो लॉकिंग दिले गेले असून प्रदूषण, आवाज व उर्त्सजनाची सर्व मानके या ट्रॅक्टर ने काटेखोरपणे पाळली आहेत. या ट्रॅक्टर मधून धूर येत नाही व त्याला जोडलेली शेतीकामाची सर्व उपकरणे अतिशय सहजतेने चालविता येतात.

युरोप व अमेरिकेत अनेक श्रीमंत शेतकरी आहेत. त्यांना दिवसभर कष्ट करावे लागतात व त्यामुळे शेतीची अवजड कामे करतानाच त्यांना लग्झरी ड्रायव्हिंग करता यावे व त्याचे काम आरामात व्हावे असाच या ट्रॅक्टर निर्मितीचा उद्देश आहे. टॉप स्पीड ताशी ५० किमी असलेल्या या ट्रॅक्टर ला ट्रॅक्टर ऑफ द इयर म्हणून मान्यता मिळाली असून त्याचे उत्पादन ऑस्ट्रिया येथील कारखान्यात केले जात आहे.

Leave a Comment