लीजन हॅकर ग्रुपचा आता संसदेवर डोळा

hacker
नवी दिल्ली: भारतातील दिग्गज व्यक्तींची ट्विटर, ई-मेल अकाऊंट हॅक करणाऱ्या लीजन हॅकर ग्रुपचे sansad.nic.in (संसद डट नीक इन) ही डोमेन सेवा पूढचे लक्ष्य असून सरकारी कर्मचाऱ्यांना sansad.nic.in हे डोमेन ईमेल सुविधा पुरवते. त्यामळे ही डोमेनसेवा हॅक झाल्यास शासकीय अधिकाऱ्यांच्या ई-मेल व्यवहारांची माहिती उजेडात येऊ शकते.

फॅक्टरडेली डॉट कॉमला लीजन हॅकर ग्रुपच्या सदस्याने दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अनेक बडे मासे हे डोमेन हॅक केल्यास गळाला लागतील असा दावाही लीजन ग्रुपच्या सदस्याने केला आहे. दरम्यान, फॅक्टर डेली डॉट कॉम ही एक टेक्नॉलॉजीबद्धल बातम्या देणारी वेबसाईट आहे. लीजनच्या सदस्याने या वेबसाईटला चॅट मुलाखत दिली. या मुलाखतीत या सदस्याने दावा केला आहे की, भारतातील काही महत्वाच्या सर्व्हरमधील डाटा आपल्याकडे असून ही माहिती जाहीर केली तर, भारतात गोंधळ निर्माण होईल. लीजन ग्रपच्या सदस्याने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीतही हाच दावा केला आहे.

दरम्यान, हॅकर्सनी डिजीटल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्र सरकारपूढे नवे आव्हान निर्माण केले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाची अशी भारताची डिजिटल बँकिंग व्यवस्था असून त्यावर अत्यंत सहजतेने सायबर हल्ला करता येऊ शकतो असा दावा लीजनने केला आहे. फॅक्टरडेली डॉट कॉमच्या मुलाखतीत लीजनला भाजपाला लक्ष्य करणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आम्ही योग्यवेळी त्यांची सुद्धा माहिती बाहेर आणू असे उत्तर दिले.

Leave a Comment