कार्डावर इंधन घेतल्यास ०. ७५ टक्के कॅशबॅक

petrol
नवी दिल्ली: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या पंपांवर क्रेडीट, डेबिट कार्ड अथवा ई वॊलेटच्या माध्यमातून पेट्रोल अथवा डिझेल खरेदी केल्यास ग्राहकांना ०. ७५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. खरेदीनंतर सुट्टीचे दिवस वगळता ३ दिवसात ही रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे.

डिजिटल व्यवहारांवर सवलती देण्याच्या केंद्राच्या निर्णयाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘इंडियन ऑइल’च्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

चलनातून ५०० आणि १ हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर व्यवहारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे या धोरणाचा एक भाग म्हणून क्रेडीट, डेबिट कार्ड अथवा ई वॊलेटद्वारे इंधनखरेदीवर ०. ७५ टक्के सूट जाणार आहे.

Leave a Comment