आज उद्या लाँच होणार मोटो एम

moto-m
भारतात लेनोवो आपला मेटल बॉडीचा स्मार्टफोन मोटो एम आज लाँच करणार आहे. या लाँचिंगसाठी अनेक मान्यवर मंडळी देखील तेथे उपस्थित असणार असून मोटो एम हा कंपनीचा सर्वात पहिला मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन आहे.

गेल्या महिन्यात चीनमध्ये मोटो एम या स्मार्टफोनला लाँच केले होते. तिथे त्याची किंमत १,९९९ युआन इतकी होती. जी जवळ जवळ १९,७०० रुपये ऐवढी असल्यामुळे अशी अपेक्षा आहे की भारतात या स्मार्टफोनची किंमत ही याच किंमतीच्या जवळपास असणार आहे.

हा स्मार्टफोन एंड्रॉयड ६.० मार्शमेलोवर रन होत आहे. तसेच ५.५ इंचाची फुल एचडी २.५ आयपीएस डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रेझॉल्यूशन १०८०x१९२० इतकी असणार आहे. मोटोमध्ये २.२ GHz ६४ बिट मीडियाटेक हीलियो पी १५ प्रोसेसर लावण्यात आलेला आहे. रॅम ४जीबी आणि इंटरनल मेमरी ३२ जीबी असणार आहे. जी १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच यामध्ये हायब्रिड सिमस्लॉट देण्यात आलेला आहे.

Leave a Comment