अब्जावधींचा उद्योग सांभाळण्यास वांग सिकोंगचा नकार

wanda
चीनमधील अब्जाधीश उद्योजक वांग जिआनींग यांचा एकुलता एक मुलगा वांग सिकोंग याने वडीलांना तुमच्यासारखे आयुष्य मला जगायचे नाही असे सांगून त्यांच्या अब्जावधींचा उद्योग सांभाळण्यास नकार दिला आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व रियल इस्टेट किंग वांग जिआंनिंग यांच्या व्यवसायाची उलाढाल ९२ अब्ज डॉलर्स म्हणजे ६.२९ लाख कोटींची आहे. वांग जांगनींग यांनी हा पसारा सांभाळण्यासाठी प्रोफेशनल व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे व त्याला प्रशिक्षण देऊन व्यवसायाची धुरा सोपविली जाणार असल्याचे स्पष्ट केले असून कंपनीत ते संचालक म्हणून कायम राहणार आहेत.

डालियान वांडा ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष वांग जियानींग म्हणाले, तरूणांचे प्राधान्य क्रम वेगळे असतात हे मान्य केले पाहिजे. १९७० ते ८६ या काळात चीनी लष्करात सेवा बजावलेल्या जियानिग यांनी सुरवात छोटे प्रॉपर्टी विकासक म्हणून केली ती पोर्टसिटी डालियान मध्ये वांडा ग्रूप या नावाने. आज त्यांची ६० शहरात ९० लाख चौरस मीटर प्रॉपर्टी, ५८ शॉपिंग प्लाझा.२५ लग्झरी हॉटेल्स, ६८ थिएटर्स,५७ डिपार्टमेटल स्टोअर्स व चित्रपटाचे १० हजार स्क्रीन्स अशी मालमत्ता आहे. एएमसीच्या खरेदीनंतर कंपनी जगातील सर्वात मोठी सिनेमा चेन बनली आहे. युरोपियन फुटबॉल क्लबमध्ये हिस्सेदारी व गोल्डन ग्लोब अॅवॉर्डचे टेलिव्हीजन हक्क त्यांच्याकडे आहेत.

वांडा यांचा एकुलता मुलगा वांग सिकाँग वांडा ग्रूपमध्ये दोन टक्के हिस्सेदार आहे म्हणजे तो १२४०० कोटींचा मालक आहे. इंटरनेट एंटरटेनमेंट, गेमिग, सोशल मिडीया, डायनिंग अशा विविध व्यवसायात त्याची गुंतवणूक आहे. चीनमधील तो मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे व वीबो या चीनच्या सोशल मिडीया साईटवर त्याचे २.१ कोटी फॉलोअर आहेत. कुत्र्यासाठी आठ आयफोन सेव्हन व आयफोन स्मार्टवॉच खरेदी केल्याप्रकरणी तो नुकताच चर्चेत होता.

Leave a Comment