मिनीची क्लबमॅन १५ डिसेंबरला भारतात

clubman
जर्मनीच्या प्रसिद्ध लग्झरी कार निर्मात्या बीएमडब्ल्यूच्या मालकीच्या मिनी कंपनीने त्यांची नवी क्लबमॅन कार १५ डिसेंबरला भारतात लाँच केली जात असल्याची घोषणा केली आहे. कंपनीची ही सर्वात मोठी मिनी कार आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक फिचर्स असलेल्या या कारला आतात्तपर्यंत सर्वाधिक म्हणजे आठ स्पीड स्टेपट्राॅनिक ट्रान्समिशन दिले गेले आहे.

या कारला पाच दरवाजे आहेत. पाच आसनी क्लबमॅनमध्ये बूटस्पेस वाढविता येण्याची सुविधा आहे. मागच्या मॉडेलपेक्षा ही कार लांबीरूंदीला अधिक आहे. बूटला चार प्रकारे रिमोट की, बंपर खालचे सेन्सर, डॅशबोर्डवर दिले गेलेले बटण, व लिव्हर मॅन्यूअली उघडून स्पेस वाढविता येण्याची सुविधा आहे. क्लबमॅन कूपर एस, एसडी व डी व्हर्जनमध्ये उपलब्ध होणार आहे.

पैकी कूपर एससाठी २.० लिटरचे ट्विन पॉवर टर्बो पेट्रोल इंजिन, कूपर डी साठी १.५ लिटरचे डिझेल, ३ सिलींडर पॉवर टर्बो डिझेल इंजिन तर ऑल व्हील ड्राईव्ह व्हर्जनसाठी २.० लिटरचे डिझेल इंजिन दिले गेले आहे. मिनी कूपरची भारतीय बाजारातली ही सर्वात महाग कार असून त्याच्या किमती ४० लाखांपासून सुरू होत आहेत.

Leave a Comment