जगातला ५७ किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा सुरू

bogda
स्वित्झर्लंडच्या झुरीकपासून निघून ते उत्तर इटालीमधील मिलान पर्यंत जाणार्‍या मार्गावरचा झुरीक ते लुगानो हा जगातील सर्वात मोठा बोगदा सुरू केला गेला आहे.५७ किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण करायला १७ वर्षे लागली व त्यासाठी ८० हजार कोटी रूपये खर्च केला गेला. आल्प्स पर्वतरांगाच्या २.३ किमी खालून हा बोगदा गेला असून गॉरहार्ट बेस टनेलचे उद्घाटन जूनमध्ये अनौपचारिक पद्धतीने केले होते. रविवारपासून या बोगद्यातून नित्य रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. या बोगद्याच्या उद्घाटनाला जर्मनीच्या चॅन्सेलर अजेंला मर्केल व फ्रान्सचे अध्यक्ष होलंड उपस्थित होते.

या बोगद्यातून रोज २६० मालगाड्या, ६५ प्रवासी ट्रेन ताशी २०० किमी वेगाने प्रवास करू शकणार आहेत. समुद्रसपाटीपासून ५५० मीटर उंच व माऊंट क्रेस्टच्या २३०० मीटर खालून हा बोगदा गेला आहे. पहाडावर ० डिग्री तपमान असले तरी या बोगद्यात ते ४६ डिग्री इतके असते. यामुळे झूरीक ते मिलान या प्रवासासाठी लागणारा वेळ १ तासाने कमी झाला आहे. या बोगद्यासाठी २६०० मजूर दररोज १७ वर्षे काम करत होते. या बोगद्यातूनच्या पहिल्या प्रवासासाठी १.३०,००० प्रवाशांनी तयारी दाखविली होती. शेवटी लॉटरी काढून त्यातून ५०० प्रवासी निवडले गेले. या बोगद्याचे डिझाईन १९४७ साली केले गेले होते मात्र पैशांची जुळवाजुळव न झाल्याने ते १९९९ मध्ये सुरू झाले. या बांधकामात ७३ प्रकारचे खडक फोडून मार्ग बनवावा लागला.

यापूर्वीचा सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून जपानच्या सीकान बोगद्याची नोंद होती. हा बोगदा ५३.९ किमी लबीचा आहे. त्याखालोखाल लांबीचा बोगदा इंग्लीश चॅनल बोगदा असून त्याची लांबी ५०.५ किमी आहे.

Leave a Comment