कर सवलत घेणार्‍या शेती उत्पादकांवर सरकारची नजर

sheti
नोटबंदी निर्णयानंतर सरकारने आता शेती उत्पन्नातून करसवलत घेणार्‍या धनाढ्य शेती उत्पादकांवर कडक नजर ठेवली असून अशा लोकांची स्क्रूटीनी सुरू केली असल्याचे समजते. शेती उत्पन्नाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणावर करचोरी होत असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते. सरकारकडून दिल्या जाणार्‍या शेती उत्पन्नावरील करसवलतींचा फायदा प्रयक्ष गरजू शेतकर्‍यांना मिळण्याऐवजी काळा पैसा बाळगणारे धनाढ्य या सवलतींचा मोठा लाभ घेतात हे गुपित राहिलेले नाही त्यामुळेच सरकारने अशा लोकांविरोधात कडक पावले उचलली आहेत.

यापुढे अशी शेती उत्पन्न कर सवलत घेणार्‍यांना शेती करत असल्याचे, धान्य उत्पादनाचे तसेच खते, बियाणी खरेदी, व मार्केटमध्ये केलेली माल विक्री यांच्या पावत्या आयकर विभागाला दाखवाव्या लागणार आहेत. जे काळा पैसा लपविण्यासाठी शेतीचा मार्ग स्विकारत आहेत ते कथित शेतकरी अशा पावत्या देऊ शकणार नाहीत. म्हणजे १ एकर शेतीतून कुणी १० लाखाचा इन्कम क्लेम करत असेल तर त्याने कोणत्या प्रकारची शेती केली हे सरकारला दाखवावे लागणार आहे.

Leave a Comment