२४० कोटी रुपयांच्या नव्या नोटा देशभरातून जप्त

note3
नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत.

अनेक ठिकाणी नोटाबंदीनंतर केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ५०० आणि १०००च्या नोटांचा साठाही जप्त करण्यात आला. एवढेच नाही तर नव्याने चलनात आलेल्या नोटांचा साठाही अनेक ठिकाणी जप्त करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार देशभरातून नोटाबंदीनंतर तब्बल २४० कोटीहून अधिक रकमेच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या कारवायांमध्ये अनेक बँक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर काहींची बदली करण्यात आली.

Leave a Comment