सुपर मॉडेल कुत्रा की

tee
अफगाणी जातीच्या एक कुत्र्याने त्याच्या स्टाईलमुळे इंटरनेटवर धूम माजवली असून त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत अनेक सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. अनेक सेलिब्रिटींपेक्षा त्याचे ऑनलाईन फॅन्सही अधिक असल्याचे समजते. या कुत्र्याचे बेंचवर बसल्याचे असे मस्त फोटो प्रसिद्ध झाले आहेत की लग्झरी डॉग फूड ब्रँड स्पोक्सडॉग ने या कुत्र्याच्या मालकाशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी पाचारण करण्याची परवानगी मागितली आहे.

ब्लॅक अफगाणी जातीच्या या कुत्र्याने नांव आहे की. डॉग शोमध्ये आपली कारकीर्द यशस्वी करून निवृत्ती घेतलेल्या कीला त्यानंतरच खूप लोकप्रियता मिळाली आहे. अनेक जाहिरात कंपन्याही त्याचा चेहरा जाहिरातीत वापरता यावा यासाठी त्याच्या मालकाशी संपर्कात आहेत. आपल्या कुत्र्याच्या या स्टेटसने मालकही खूष आहे. तो म्हणतो, आम्ही रस्त्यावरून त्याला फिरायला नेत असलो तरी लोक थांबून थांबून त्याच्याकडे पाहतात व याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

Leave a Comment