दहशतवादी हल्ल्यांनंतर फ्रान्स भारतीय पर्यटकांना आकर्षित करणार

france
एकानंतर एक दहशतवादी हल्ल्याला सामोरे गेलेला फ्रान्स देश आता पर्यटनासाठी बॉलिवडू चाहत्यांकडे आशेने पाहत आहे. गेल्या एक वर्षात झालेल्या काही हल्ल्यांमुळे फ्रान्सच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झालेला आहे. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. त्यामुळे या उद्योगाला सहारा देण्यासाठी फ्रान्स आता भारताकडे पाहत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला बेफिक्रे हा चित्रपट मंदीत सापडलेल्या फ्रान्समधील पर्यटनाला संजीवनी देईल, अशी तेथील सरकार आशा आहे. या चित्रपटात कोट डे अजूर येथील सोनेरी समुद्रकिनारे तसेच पॅरिसची साईन नदी आणि प्रसिद्ध ऑपेरा हाऊसचे छत अशा अनेक मनमोहक स्थळांचे चित्रण करण्यात आले आहे. संपूर्णपणे फ्रान्समध्ये चित्रित झालेला हा बॉलीवुडचा पहिलाच चित्रपट आहे, असा निर्मात्यांचा दावा आहे.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या मार्केटिंगच्या मोहिमांच्या तोडीस तोड असा हा चित्रपट असल्याचे फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झांडर सीगलर यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, भारतासारख्या देशात लोकांच्या पर्यटनाच्या आकांक्षांवर चित्रपटाचा मोठा परिणाम होतो. भारतातील मध्यमवर्गावर चित्रपटांचा सर्वाधिक परिणाम होतो, यात काही दुमत नाही.

आतापर्यंत बहुतांश देश चीनी पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता ते भारतावरही लक्ष देत आहेत. भारतीय पर्यटकांच्या परदेश दौऱ्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. वर्ष 2014 मध्ये दोन कोटी लोकांनी परदेशी प्रवास केला. हीच संख्या वर्ष 2020 पर्यंत 5 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

भारतीय लोक सुरक्षेच्या बाबतीत फारसे चिंतित नसतात. त्यामुळे अलीकडे फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर ही बाब महत्त्वाची ठरू शकते, असे फ्रान्सच्या एका मार्केटिंग एजन्सीच्या मार्केटिंग डायरेक्टर सोफी लाकरेसोनिएरे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी बॉलीवुड चित्रपटांच्या माध्यमातून अनेक युरोपीय देशांना फायदा झाला आहे. वर्ष 2012 मध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पेनला जाणाऱ्या भारतीयांची संख्या दुप्पट झाली होती.

Leave a Comment