अॅपल आयफोन लाल रंगातही येणार

redphone
अॅपलचा आयफोन एट बाजारात कधी येणार याच्या चर्चा सुरू असताना मॅकोटकाराने त्यांच्या वेबसाईटवर आयफोन सेव्हनची पुढची पिढी आयफोन सेव्हन एस, सेव्हन एस प्लस नावाने बाजारात आणली जात असल्याची बातमी दिली आहे. वेबसाईटवरील माहितीप्रमाणे अॅपलचा हा स्मार्टफोन त्यांच्या नेहमीच्या रंगाव्यतिरिक्त लाल रंगातही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अॅपल आयफोन सेव्हन सध्या गोल्ड, रोझगोल्ड, सिल्व्हर, ब्लॅक व जेट ब्लॅक रंगात उपलब्ध आहेत. नवा आयफोन सेव्हन एसला वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी व ग्लास केसिंग दिले जाणार नाही असेही सांगितले जात आहे. अर्थात या फोनमध्ये हार्डवेअर अपडेट केलेले असेल. त्यासाठ जादा पॉवरफुल ए ११ चिपसेट लावली जाईल असेही समजते.

Loading RSS Feed

Leave a Comment