
अल्काटेलने भारतात त्यांचा नवा आयडॉल फोर स्मार्टफोन लाँच केला असून तो सध्या फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. व्हीआर हेडसेट व आयबीएल हेडफोन्ससह असलेल्या या फोनला एक बूम की देण्यात आली आहे. तिच्या सहाय्याने कॅमेरा, गॅलरी, व्हिडीओ, गेम्स, व अन्य अॅप्स अॅक्सेस करता येणार आहेत. या फोनची किंमत आहे १६९९९ रूपये.
व्हीआर हेडसेटसह अल्काटेलचा आयडॉल फोर लाँच
ड्युल सिमच्या या फोनला अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ५.२ इंची फुल एचडी डिस्प्ले, ३ जीबी रॅम, अॅड्रीनो ४०५ जीपीयू, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोकार्डच्या सहाय्याने ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर कॅमेरा ड्यूल एलईडी सह तर फ्रंट कॅमेरा ८ एमपी, क्विकचार्ज टेक्नॉलॉजी २.० सह बॅटरी अशी फिचर्स दिली गेली आहे. हा फोन फोरजी, एलटीएफ, ब्ल्यूटूथ, वायफाय अशा कनेक्टिव्हीटी ऑप्शन्ससह आहे. डार्क ग्रे, मेटल सिल्व्हर, गोल्ड अशा रंगात तो उपलब्ध आहे.
