मौल्यवान कुत्र्याच्या चोरीप्रकरणी चार अटकेत

kutra
आयर्लंड पेालिसांनी शिकारी कुत्रा ग्रे हाऊंड याच्या चोरीप्रकरणात चार जणांना अटक केली असल्याची बातमी झळकली आहे. हा कुत्रा १० लाख युरो म्हणजे साडेसात कोटी रूपये किंमतीचा आहे. क्लेअर्स रॉकेट असे त्याने नाव असून टिपरेरी काऊंटीमध्ये त्याला प्रशिक्षण दिले जात असताना तो चोरीला गेला किंवा त्याचे अ्रपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करून चार जणांना अटक केली व रॉकेटला सुरक्षित परत आणले.

श्वानतज्ञ इयन फॉर्च्युन यांच्या मते रॉकेट हा ग्रे हाऊंड रेसिंगमधला सुपरस्टार आहे. तो हरविल्यानंतर त्याच्यासाठी ५४ हजार युरोंचे इनाम लावले गेले होते. दीड वर्षाचा रॉकेट वेग व पळण्याच्या कलेत माहिर समजला जातो. टिपरेरी काऊंटी येथे त्याला प्रशिक्षण दिले जात होते. या चोरीची तुलना १९८३ मध्ये झालेल्या रेसर घोडा शेरगरच्या अपहरणाशी केली जात आहे.

Leave a Comment