मालकाच्या मूडनुसार रंग बदलणारी लिट एस आय कार

caee
जपानी कार निर्माती कंपनी लेक्ससने त्यांची नवी सेडान २०१७ लिट एस आय चे मॉडेल पेश केले असून ही कार मालकाच्या मूडप्रमाणे रंग बदलते. त्यासाठी तिच्यावर ४१९९९ प्रोग्रॅमेबल एलईडी लाईट लावले गेले आहेत. प्रत्यक्षात या कारवर ४२ हजार लाईट लावले जाणार होते मात्र लाईट लावणार्‍याच्या खिशात एक लाईट चुकून राहिला असेही समजते.

या लाईटचे तीन मोड आहेत. अॅक्ट्रॅक्ट मोडमध्ये कलरफुल ग्राफिक्स लूप्स व कारच्या लाईन्स दिसतात. म्युझिक वीज मोड मध्ये स्टिरियोवर जी गाणी वाजतात त्यानुसार कार ग्राफिक बदलते व ग्रेचर मोड मध्ये हातांच्या इशार्‍यानुसार ग्राफिक बदल होतात. ही कन्सेप्ट कार नाही तरीही तिची किंमत जाहीर केली गेलेली नाही तसेच ती विक्रीसाठी उपलब्ध नाही. लॉचिंगच्या वेळी ब्रिटनची लोकप्रिय गायिका डुआ लिपाने बी द वन नावाचा व्हीडीओ सादर केला होता.

असेही समजते की या कारवर बसविले गेलेले सर्व लाईट हाताने लावले गेले आहेत व त्यासाठी ५२८० फूट वायर लागली आहे. भविष्यात अशा कार बाजारात येतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment