बँका सलग तीन दिवस राहणार बंद

bank
मुंबई – सर्वसामान्य नागरिक नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक आणि एटीएम बाहेर रांगा लावल्याने त्रस्त झाले असून नागरिकांना आणखीन थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. कारण, बँका उद्यापासून सलग तीन दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे तुमची बँकेशी संबंधित असलेली महत्वाची कामं आजच पूर्ण करुन घ्या.

बँका १० डिसेंबर, ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी बंद असणार आहेत. त्यामुळे, आजच तुमची बँकेशी संबंधित कामे तुम्ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला तीन दिवस वाट पहावी लागणार आहे. म्हणून बँकेचे व्यवहार आजच पूर्ण करुन घ्या. १० डिसेंबर रोजी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असणार, ११ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत आणि १२ डिसेंबर रोजी म्हणजेच सोमवारी ईद-ए-मिलाद असल्याने बँका बंद असणार आहेत.

नोटाबंदीनंतर सध्या बँकेतून आणि एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची मर्यादा आहे. या मर्यादांमुळे नागरिकांना बँकेत आणि एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातच आता सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या समस्येत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने तुमची काम आज पुर्ण झाली नाहीत तर तुम्हाला मंगळवारपर्यंत वाट पहावी लागेल. त्यामुळे आजच वेळ काढून तुमची बँकेशी संबंधित कामे पूर्ण करुन घ्या.

Leave a Comment