गुंतवणुकदारांची सायबर सिक्युरिटी स्टार्टअपना पसंती

securi
नोटबंदीचा एक परिणाम म्हणजे गुंतवणूकदारांनी सायबर सिक्युरिटी स्टार्टअप कंपन्यांना अचानक दिलेली पसंती असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नोटबंदीमुळे सायबर सिकयुरिटी कंपन्यांची मागणी तेजीत असून स्टार्टअप फंडींगमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षात या कंपन्याना २ हजार कोटींचे फंडींग उपलब्ध झाल्याचे व त्यामागे प्रामुख्याने नोटबंदी हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.

विश्लेषण क्षेत्रातील कंपनी ट्रॅक्स च्या अहवालानुसार २०१५-१६ मध्ये सायबर सुरक्षा इंडस्ट्रीमध्ये २७ नव्या कंपन्या दाखल झाल्या असून आता स्टार्टअ्पची संख्या १२७ वर गेली आहे. जागतिक गुंतवणूकदार, सीड फंड मॅनेजर्स, वेंचर कॅपिटॅलिस्ट सायबर सिक्युरिटी स्टार्टअप्सना पसंती देत आहेत. सध्या आर्थिक क्षेत्रात फ्रॉड लेव्हल वाढती आहे व त्याचाच प्रभाव गुंतवणूकदारांवर आहे. २०१३ मध्ये या क्षेत्रातील कंपन्यांना फंडिंग मिळविण्यात अनेक अडचणी येत होत्या, त्यातील कांहींनी तर स्वतःच गुंतवणूक केली होती. मात्र आता हे चित्र बदलत चालले आहे. दुवा स्टार्टअपला ११.८ कोटी डॉलर्स तर आयपॉलिसी नेटवर्कला ४० लाख डॉलर्सचे फंडिग मिळाले असल्याचे समजते.

Leave a Comment