आश्चर्याने थक्क करणारे रॉक स्टॅच्यू

buddha
जगभरात शिल्पकार, चित्रकारांनी एकापेक्षा एक अजरामर कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यातील कांही तर इतक्या प्राचीन काळातल्या आहेत की त्याकाळी ही कलाकृती कशी बनविली गेली असेल याचे नवल वाटते. जगाच्या विविध भागात असेच बनविलेल्या कांही रॉक स्टॅच्यूही कुतुहलाचा विषय ठरले आहेत. पहाड फोडून बनविले गेलेले हे भव्य स्टॅच्यू पाहिले म्हणजे आश्चर्याने तोंडात बोट गेल्याशिवाय रहात नाही. अशा तीन खास स्टॅच्यूंची ही माहिती

लेशान बुद्ध – शिजुओ पहाडात ८ व्या शतकात कोरला गेलेला हा पुतळा सुमारे २३३ फूट उंचीचा आहे. हा पुतळा असा कोरला गेला आहे की भोवतीच्या तीन नद्यंाकडे तो पाहतो आहे असे वाटते व त्याचा चेहरा माउंट एमेई कडे आहे. असे सांगतात की बनविल्यानंतर हा पुतळा सोन्याने मढविला गेला होता. युआन राजवंशात जेव्हा चीनवर मंगोल आक्रमण झाले तेव्हा हे सोने लुटले गेले. चीनमधील आज हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

rajaa
स्टॅच्यू ऑफ डेसेबालस- रोमानियातील ओर्सोवा येथे बनविलेला हा पुतळा १३१ फूट उंचीचा आहे. डॅन्यूब नदी किनारी असलेला हा पुतळा युरोपातील सर्वात उंच रॉक स्टॅच्यू मानला जातो. रिओ द जनेरोच्या ख्राईस्ट द रिडीमरपेक्षाही हा पुतळा २६ फुटाने अधिक उंच आहे.राजा डेसेबालस याचा हा पुतळा १९९४ मध्ये बनविण्यास सुरवात झाली होती व तो २००४ साली पूर्ण झाला.

itali
दा अप्पेन्निने कोलासस हा रॉक स्टॅच्यूही असाच आगळावेगळा म्हणावा लागेल. याची उंची ३५ फूट आहे मात्र तो १५७९ सालात बनविला गेला आहे. इटलीच्या फलॉरेन्स विला मेडिसी बगिच्यात हा पुतळा बसविला गेला आहे. पुतळ्याचा मूर्तीकार गिआंबो लोगना याने त्याच्या मालकिणीच्या इच्छेखातर हा पुतळा बनविला होता. या पुतळ्याच्या आत अनेक कारंजी असून हेच त्याचे खास वैशिष्ठ आहे.

Leave a Comment