यंदा २ मार्चला आंगणेवाडीची जत्रा

anganewadi
सिंधुदुर्ग : यंदा २ मार्चला सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा होणार असून आंगणेवाडीची ही यात्रा प्रति पंढरपूर नावाने प्रसिद्ध आहे. सुमारे १० लाख भाविक या यात्रेस हजेरी लावतात. यात्रेनिमित्त सामान्यांसह नेतेमंडळी दरवर्षी यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यंदा मात्र नेत्यांची ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते मोठ्या संख्येने आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवस बोलणे, नवस फेडणे यासाठी नेते आंगणेवाडीला येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment