जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनची नवी योजना

vodafone
मुंबई – देशभरातील टेलिकॉम कंपन्यांसमोर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओची ४जी सेवा सुरू झाल्यानंतर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विविध कंपन्यांकडून जिओला टक्कर देण्यासाठी टॅरिफ आणि डेटा प्लानच्या दरांमध्ये मोठी कपात केली जाते आहे. आता वोडाफोननेदेखील जिओच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी डेटागिरी करण्याचा निेर्णय घेतला आहे. प्रीपेड मोबाईल धारकांना वोडाफोनकडून २५५ रुपयांवरील सर्व ४जी रिचार्जवर दुप्पट डेटा देणार आहे. या डेटा पॅकची वैधता २८ दिवसांची असणार आहे. त्यामुळे वोडाफोनच्या ग्राहकांना दुप्पट डेटा वापरता येणार आहे.

या अतिरिक्त इंटरनेट डेटाचा लाभ वोडाफोनच्या सध्याच्या सर्व ग्राहकांना घेता येणार आहे. २५५ रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्व ४जी रिचार्जवर दुप्पट डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे ९९९ रुपयांना ४जी इंटरनेटचा १० जीबीचा डेटा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता त्याच पैशांमध्ये २० जीबी डेटा वापरता येणार आहे. रिलायन्सचे आव्हान मोडीत काढण्यासाठी वोडाफोनकडून ही खेळी करण्यात आली आहे.

डबल डेटा बोनॅन्जा ऑफर वोडाफोनकडून सर्व ग्राहकांना दिली जाते आहे. वोडाफोन ४जीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नवी योजना सुरू करत आहोत. आमच्या सर्व ग्राहकांसाठी ही योजना उपलब्ध असेल, अशी माहिती दिल्ली वोडाफोनचे एनसीआरचे बिझनेस हेड अपूर्व मल्होत्रा यांनी दिली आहे.

Leave a Comment