गुरूजींचा वाढदिवस ७२५८५ मेणबत्त्या लावून साजरा

cake
भारतीय अध्यात्मिक गुरू स्वर्गीय श्री चिन्मय यांची ९५ वी जयंती अमेरिकेत केकवर ७२५८५ मेणबत्त्या पेटवून साजरी करण्यात आली. केकवर इतक्या प्रचंड संख्येने मेणबत्त्या पेटविण्याचा हा एक विक्रम होता व त्याची नोंद गिनिज बुकमध्ये करण्यात आली. यापूर्वीचा केकवर ५०१५१ मेणबत्त्या पेटविण्याचा विक्रम कॅलिफोनिर्यातील माईकस हार्ड लेमोनेड यांच्या नावावर होता.

श्री चिन्मयकुमार घोष यांनी १९६४ मध्ये न्यूयॉर्क मध्ये आल्यानंतर श्री चिन्मय या नावाने पश्चिमेला ध्यानधारणेची दीक्षा दिली होती.श्रीचिन्मय यांच्या जयंतीनिमित्त न्यूयॉर्कच्या केंद्रात सुमारे १०० लोकांची टीम केकवर मेणबत्त्या लावण्यासाठी सक्रीय होती. या मेणबत्त्या ६० ब्लो टॉर्चच्या मदतीने पेटविल्या गेल्या व रेकॉर्ड करण्यासाठी त्या ४० सेकंद तेवत्या ठेवल्या गेल्या. त्यानंतर परंपरेनुसार एकाच फुंकरीत त्या विझविणे शक्य नसल्याने फायर एक्स्टीगविशरची मदत घेऊन त्या विझविल्या गेल्या. यामुळे केक खाण्यायोग्य राहिला. या रेकार्डसाठी ८०.५ फूट लांब व दोन फूट रूंदीचा केक बनविला गेला होता.

Leave a Comment