येतेय सुपरसॉनिक कार, वेग ताशी १६०० किमी.

supersonic
सुपरकारचे दिवस आता मागे पडत चालले आहेत कारण २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत चिनी कार निर्मात्या कंपनीने बनविलेल्या सुपरसॉनिक कारच्या वेगाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहत. ही कार ताशी १६०० किमीच्या वेगाने धावेल अशी अपेक्षा असून वेगाची चाचणी अँडी ग्रीन हा चालक घेणार आहे. ब्लंड हाऊंड एसएससी नावाच्या कंपनीने ही कार तयार केली आहे. आत्तापर्यंतच्या वेगाची सर्व रेकॉर्ड ही कार मोडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे सध्याचे जमीनीवरील वेगाचे रेकॉर्ड चालक अँडीच्याच नावाने असून त्यावेळी त्याने १२०० किमी प्रतितास वेगाने कार चालविली होती. नव्या सुपरसॉनिक कारसाठी १३५०० हॉर्स पॉवरचे इंजिन दिले गेले आहे व ते तीन पॉवर प्लाँट मिळून बनविले गेले आहे. या कारच्या निर्मितीसाठी १ अब्ज ५६ कोटी रूपये खर्च आला असून या कारची ताकद १३० एफवन कार एकत्र केल्यावर होईल तितकी आहे.रोल्स रॉईस ईजे २०० जेट इंजिन या कारला दिले गेले आहे. हे इंजिन हायब्रीड रॉकेट साठी वापरले जाते. नवी कार जमिनीवर चालणार्‍या रॉकेटसारखीच असून तिचे कॉकपिट जेट विमानासारखे आहे.

Leave a Comment