१०० रूपये मूल्याच्या नव्या नोटा येणार

100ru
मुंबई- रिझर्व्ह बँकेने ५० व २० च्या नव्या नोटांनंतर १०० रूपये मूल्याच्या नव्या नोटाही बाजारात आणल्या जात असल्याची घोषणा केली आहे. अर्थात जुन्या १०० रूपयांच्या नोटा चलनात राहणार आहेत. नव्या १०० रूपये नोटेमध्ये दोन्ही बाजूंना थोडा बदल केला गेला आहे. रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधी सिरीज २००५ नुसारच नव्या १०० च्या नोटा छापल्या जात असल्याचे जाहीर केले आहे.

नव्या नोटेवर गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही असेल तसेच मुद्रण वर्ष २०१६ असेल. नोटेचे डिझाईन जुन्या नोटांप्रमाणेच आहे मात्र नंबर पॅनल, नंबर सिरीज, ब्लीड लाईन व ओळख खुण्या थोड्या मोठ्या आकारात असतील असेही कळविले गेले आहे.

Leave a Comment