मनमोहक गुलाबी पाण्याचे सरोवर

gulabi
जगभरात कोट्यावधींच्या संख्येने सरोवरे आहेत. त्यातील कांही स्फटीकासारख्या पाण्यामुळे, कांही निळीशार, कांही गहीरी हिरवी, कांही कांही काळ्या पाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियात मात्र एक सरोवर चक्क गुलाबी रंगाच्या पाण्याचे आहे. या सरोवराचे नांव आहे हिलर लेक. त्याचे खरे नांव सलीना दे टोरोविरोजा असे असले तरी या पाण्यामुळे अनेकांच्या व्याधी बर्‍या होतात म्हणून ते हिलर लेक नावाने ओळखले जाते.

ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ जगात प्रसिद्ध आहे त्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी असतेच मात्र अनेक पर्यटक हिलर लेकच्या आकर्षणानेही येथे येत असतात. हे सरोवर फारसे मोठे नाही. मात्र त्याचा रंग हा मोठाच कुतुहलाचा विषय आहे. यातील पाणी स्ट्राॅबेरी दुधासारखे गुलाबी आहे. या पाण्यात क्षारांचे प्रमाण खूप आहे व त्यामुळे सूर्यप्रकाश कसा येतो त्यानुसार त्याचा रंग बदलतो. या सरोवराकाठी निलगिरी व पेपर बार्कची दाट झाडी आहे.

या पाण्याला आलेला रंग क्षारांमुळे तसेच पाण्यात असलेले बॅक्टेरिया व एक प्रकारच्या बुरशीमुळे असल्याचे सांगितले जाते. मात्र हे जंतू मानवासाठी अपायकारक नाहीत तर उपकारक आहेत. क्षार जास्त असल्याने पाण्याची घनता अधिक आहे व त्यामुळे या पाण्यावर माणूस सहज तरंगू शकतो. १८०२ मध्ये मॅथ्यू फ्लिंडर्स नावाच्या संशोधकांने या सरोवराचा शोध लावल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment