उडणार पेट्रोल अन् डिझेलच्या दराचा भडका!

petrol
मुंबई – प्रति दिवस सुमारे १२ लाख बॅरलने कच्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय ओपेकने घेतल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता क्रिसील रिसर्चने व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यात कच्या तेलाच्या उत्पादनात प्रति दिवस सुमारे १२ लाख बॅरलने कपात करण्याचा निर्णय ओपेकने (तेल निर्यातदार देशाची संघटना) घेतला. या निर्णयामुळे आगामी ३-४ महिन्यात पेट्रोलच्या दरात ५ ते ८ टक्क्याने वाढ होणार आहे. तर डिझेलच्या दरात ६ ते ८ टक्क्याने वाढ होणार आहे, असे क्रिसीलचे म्हणणे आहे. उत्पादनात झालेल्या कपातीमुळे नेहमी दरवाढीचा फटका बसतो. मात्र, ओपेकच्या करारानुसार दरावर काही प्रमाणात निर्बंध लागले आहेत.

Leave a Comment