सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होत्या जयललिता

jaylaसोमवारी रात्री स्वर्गवासी झालेल्या तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होत्या. त्यांची संपत्ती ११७ कोटींची असल्याचे त्यांनी निवडणक आयेागाच्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक फॉर्म भरताना स्पष्ट केले होते.

मे महिन्यात ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या आरेापातून चेन्नई हायकोर्टाने त्यांनी निर्दोष सुटका केल्यानंतर त्यांनी जून २०१५ मध्ये उपनिवडणूक लढविताना हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार त्यांच्याकडे ४५.०४ कोटींची चल, ७२.०९ कोटींची अचल संपत्ती होती. या प्रतिज्ञापत्रानुसार बँकेत त्यांचे ९ कोटी ८० लाख रूपये होते तर पाच कंपन्यांत त्यांनी ३१.६८ कोटी रूपये गुंतविले होते. पोज गार्डनमधील त्यांच्या घराची किंमत ४४ कोटी आहे तर चेन्नई, हैद्राबाद शहरात त्यांच्या चार कमर्शियल इमारती आहेत. तेलंगाणा रंगारेड्डी जिल्ह्यात त्यांच्या नावावर १४.५ एकर जमीन आहे व त्यांच्याकडे नऊ वाहने आहेत.

विशेष म्हणजे आयकर विभागाने त्यांच्यावर घातलेल्या धाडीत २१.२८ किलो सोने जप्त केले गेले होते. मे २०११ मध्ये त्यांची संपत्ती ५१.४० कोटींची होती ती चार वर्षात म्हणजे २०१५ सालात ११७ कोटींवर गेली होती.

Leave a Comment