भारतात लाँच झाला एलजीचा व्ही २० स्मार्टफोन

lg
नवी दिल्ली : भारतीय बाजारात एलजीचा व्ही २० हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन लाँच झाला असून भारतामध्ये या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली असून हा फोन विक्रीसाठी अॅमेझॉन आणि ऑफलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहे.

व्ही २०मध्ये भारतातील हा अँड्रॉईडची नवीन नॉगट ७.० सिस्टीम देण्यात आले आहे. व्ही १० या फोनचे हे नवे व्हर्जन आहे. मात्र यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. एलजी व्ही २०मध्ये सिग्नेचर फीचर ५.७ इंच आकाराची ड्युअल स्क्रीन, स्नॅपड्रॅगनचा ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले असून याचा रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल आयओएस, फेस डिटेक्शन आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment