बीएसएनएलचा जिओच्या तोडीसतोड प्लान

bsnl
नवी दिल्ली – लवकरच १४९ रुपयांत भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना महिन्याभरासाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी फोन करण्याची सुविधा मिळू शकते. बीएसएनएल हा प्लान नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारीला आणण्याची शक्यता आहे. अनेक टेलिकॉम कंपन्यांसमोरील आव्हान रिलायन्स जिओमुळे वाढले आहे. अशातच या नव्या प्लानसोबत रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसनएलला मदत मिळेल.

जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड फोन कॉल, ३०० एमबी इंटरनेट डाटा आणि १०० लोकल, नॅशनल एसएमएसच्या सुविधा मिळतात. इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना आमच्या ग्राहकांसाठी १४९ रुपयांचा अनलिमिटेड फोन कॉलच्या ऑफरवर काम करत असल्याचे बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. तसेच या प्लानमध्ये ३०० एमबी इंटरनेट डेटाही मिळेल असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment