नवीन वर्षात येतेय मारूती सुझुकीची सेव्हन सीटर वॅगन आर

wagonr
देशात मारूती सुझुकीच्या लेाकप्रिय हचबॅक कार श्रेणीत गणली जाणारी मारूती वॅगन आर आता अधिक मोठी होऊन नवीन वर्षात भारतीय बाजारात दस्तक देणार आहे. या कारचे सेव्हन सीटर व्हर्जन बाजारात आणले जात आहे. वॅगनआरला मिळालेली लोकप्रियता व मागणी तसेच बाजारात या कारला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन मोठ्या कुटुंबासाठी सेव्हन सीटर कार आणण्याचा निर्णय मारूती व्यवस्थापनाने घेतला होता. ही कार फक्त मोठीच नाही तर सेव्हन सीटर सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्तही असेल. या कारच्या किंमती ५.२ लाखांपासून सुरू होतील व आर बेस, आर टॉप व सीएनजी अशा तीन व्हेरिएंटमध्ये ती बाजारात दाखल होईल असे समजते.

मारूती सुझुकीची वॅगन आर भारतात १९९९ मध्ये प्रथम सादर झाली होती. सर्वाधिक विक्री होणार्‍या कारमध्ये तिचा समावेश आहे. दिसायला लहान असली तरी या कारची अंतर्गत स्पेस अतिशय आरामदायी असल्याने ग्राहकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळाला. सेव्हन सीटरचे बॉडी ग्राफिक थोडे नवीन आहे. की लेस एंट्री, सेंट्रल लॉकिग, सिक्युरिटी अलार्म, ड्युल टोन डॅशबोर्ड, ब्ल्यू टूथसह डबल डीन स्टीरीयो, रियर पॉवर विंडो अशी त्याची फिचर्स आहेत. कारला १.२ लिटर ३ सिलींडर इंजिन दिले गेले असून पाच स्पीड मॅन्यअल व अॅटो ट्रान्समिशनही दिले गेले आहे.

Leave a Comment