एअरसेलने आणली मोफत अनलिमिटेड डेटा, व्हॉईस कॉलिंगची ऑफर

aircel
नवी दिल्ली : देशात मोफत इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉलिंग ऑफर रिलायन्स जिओने दिल्यानंतर एकच धमाका झाला. अनेक कंपन्या त्यानंतर जिओला टक्कर देण्यासाठी वेगवेगळ्या मोफत ऑफर घेऊन येत आहेत. अशातच आता एअरसेल या कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओसारखीच एक ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ९० दिवसांसाठी ही ऑफर असून या ऑफरचे नाव एफआरसी १४८ असे आहे.

एअरसेलच्या या नव्या ऑफरनुसार, नव्या ग्राहकांना १४८ रुपयांच्या पहिल्या रिचार्जमध्ये ९० दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड एअरसेल टू एअरसेल व्हॉईस कॉलिंग आणि इतर ऑपरेटर्ससाठी १५ हजार सेकंद प्रति महिन्याला मिळणार आहेत. याशिवाय अनलिमिटेड २जी डेटा मिळणार आहे. या ऑफरचा केवळ नवीन ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरण्याचा आनंद घेता यावा, यासाठी ही ऑफर आणली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही ऑफर केवळ दिल्लीतील ग्राहकांसाठी असणार आहे.

Leave a Comment