इनफोकसचा आधार वापराचा स्मार्टफोन भारतात लवकरच

infocus
अमेरिकन कंपनी इनफोकस ने आधार नंबरचा ऑथेंटिकल वापर करता येणारा आयरिस स्कॅनरसहचा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी केली असल्याचे भारताचे कंट्री हेड सचिन थापर यांनी सांगितले. हा फोन नव्या वर्षात भारतात लाँच केला जात असून त्याची किंमत १२ हजार रूपयांच्या दरम्यान असेल. आधार आधारित हा फोन लाँच करण्यासाठी आवश्यक असलेले स्टँडर्डाइजेशन टेस्टींग अॅन्ड क्वालिटी सर्टिफिकेशन भारत सरकारकडून कंपनीने घेतले असल्याचेही समजते.

या फोनमध्ये आधार योजनेशी संबंधित बायोमेट्रीक ऑथेंटिकेशनसाठी आयरिस रिकग्नेझिशन डिव्हाईसचा वापर केला गेला आहे. थापर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारचा सध्या बाजारात सॅमसंग गॅलेक्सी टॅब हा फोन आहे. इनफोकसचा नवा फोन एम ४२५ हा इनफोकसच्या बिंगो २० चे व्हेरिएंट आहे. बिंगो २० साठी ड्युल सिम, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप, १ जीबी रॅम, ४.५ इंची स्क्रीन, ८ जीबी इंटरनल मेमरी व फोर जी व्होल्ट सपोर्ट अशी फिचर्स आहेत.

Leave a Comment