इंटरनेटशिवायही घेऊ शकाल आता मोबाइल बॅंकिंग सेवेचा फायदा

mobile-banking
नवी दिल्ली: सरकारने नोटाबंदीनंतर कॅशलेस इंडिया करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. आता सामान्य मोबाईलवरून इंटरनेट कनेक्शनशिवाय बॅंकिंग करता येईल अशा तंत्रज्ञाचा विकास करावा, अशी सूचना केंद्र सरकारने दुरसंचार कंपन्यांना दिली आहे. असे झाले तर इंटरनेटशिवायही लोकांना मोबाईलवरुन बॅंकिंग करण्यात येणार आहे.

अनेक वर्षानंतर सरकारकडून अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा म्हणजेच यूएसएसडी पद्धत सुरु करण्यासाठी हालचाली होत आहेत. या तंत्रामुळे बँक खात्यातील रक्कम पाहणे, फंड ट्रान्सफर असे काम इंटरनेटविना देखील केले जातील. शनिवारी बँकिग, टेलिकॉम, मोबाईल आणि पेमेंट इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींची केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी बैठक घेतली. सरकार यूएसएसडीला प्रोत्साहन देणार असून टेलिकॉम कंपन्यांनी हा मुद्दा प्राधान्याने घ्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

युएसडी ही एक इंटर-अ‍ॅक्टीव्ह टेक्स्ट मॅसेज सिस्टीम आहे. याच्या माध्यमातून मोबाईल फोन द्वारे आपल्या बॅंकेपर्यंत पोहचू शकतो. देशातील ९० कोटी मोबाईलमध्ये ६० ते ६५ टक्के बेसिक फिचर्स फोन्स आहेत. यापार्श्वभूमीवर ‘डिजिटल इंडिया’ च्या माध्यमातून सामान्य मोबाईलवरून इंटरनेटशिवाय बॅंकिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment