प्रथमच कर्मचार्‍यांना मायक्रो एटीएमने पगार वाटप

microat
नोटबंदी नंतर प्रथमच कर्मचार्‍यांना मायक्रो एटीएमने पगार वाटप करण्याचा प्रयोग आग्रा येथील एक पादपात्रे कारखान्यात यशस्वी करण्यात आला. यामुळे नव्या नोटा मिळाल्याचा आनंद कर्मचार्‍यांना लुटता आला व मालकालाही पगार वाटप येळेत झाल्याने सुटकेचा श्वास टाकता आला. सुमारे १२०० कर्मचार्‍यांना या पद्धतीने पगार वाटप केले गेले.

ओम एक्स्पोर्टचे मालक रवि सहगल या विषयी माहिती देताना म्हणाले आम्ही दर आठवड्याला कामगारांचे पगार करतो. मात्र नोटबंदी जाहीर झाल्यानंतर पगार कसा द्यायचा याची चिंता होती. प्रथम बिग बजार व बेस्ट प्राईजकडून १-१ हजारांची कूपन्स आणून ती दिली मात्र ब्रँडेड असल्याने कर्मचार्‍यांना तो माल महाग वाटला शिवाय सर्व रकमेचा मालच खरेदी करावा लागला. त्यानंतर कारखान्यातच आम्ही दुकान उघडले मात्र तेथेही सर्व माल १ किलोच्या पॅकमध्ये असल्याने अडचणी आल्या. तेव्हा बँक ऑफ इंडिया आमच्या मदतीला आली व त्यांनी मायक्रो एटीएमने पगार वाटपाचा मार्ग दाखविला.

बँकेचे कर्मचारी स्वाईप मशीनसह कारखान्यात आले व त्यांनी लॅपटॉपला मायक्रो एटीएम अॅटॅच करून यादीत असलेल्या कर्मचार्‍यांना पैसे वाटप केले.त्यासाठी कर्मचार्‍यांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात आले व ज्या कर्मचार्‍यांची बँक अकौंट नव्हती त्यांना १० मिनिटात अकौंट ओपन करून पगार दिला गेला. कर्मचार्‍यांना पेटीएम, इन्शरन्स सुविधाही दिली गेली. कर्मचार्‍यांनी त्यच्या गरजेनुसार पैसे काढले. देशात असा प्रयोग प्रथमच केला गेला. या प्रकारे आता दर आठवड्याला बँक अधिकारीच मायक्रो एटीएमसह कारखान्यात येणार आहेत.

Leave a Comment