निस्सानची गॉडझिला जीटीआर भारतात लाँच

nissangtr
निस्सानची सुपरलग्झरी व गॉडझिला नावाने लोकप्रिय ठरलेली जीटीआर कार भारतात लाँच करण्यात आली आहे. ही कार जपानमधून थेट आयात केली जाणार आहे. दिल्लीत तिची एक्सशो रूम किंमत १.९९ कोटी रूपये आहे. अतिशय मस्त फिचर्स व पॉवरफुल इंजिन ही या कारची खास वैशिष्ठ्ये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार पूर्वीच दाखल झाली आहे मात्र भारतात सादर केल्या गेलेल्या मॉडेलमध्ये थोडे बदल केले गेले आहेत.

या कारमध्ये प्रवाशांचा प्रवास अतिशय आरामदायक होईल व प्रवासी सुरक्षा व आवश्यक सुविधाही त्यांना मिळू शकतील अशी काळजी घेतली गेली आहे. कारमध्ये ८ इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम अॅपल कार प्ले व अँड्राईड सपोर्टसह दिली गेली आहे. चार प्रवासी या कारमधू प्रवास करू शकतील. कारला ३.८ लिटरचे व्ही सिक्स २४ व्हॉल्व्ह ट्विन टर्बोचार्ज इंजिन दिले गेले आहे. सहा स्पीड मॅन्युअल ड्यूल क्लच ऑटो गिअर बॉक्स सह ऑल व्हील ड्राईव्ह सुविधा दिली गेली आहे. ० ते १०० किमीचा वेग ही कार तीन सेकंदापेक्षा कमी वेळात घेते.

Leave a Comment