बाजारात येणार २०, ५० रुपयांच्या नव्या नोटा

rbi
मुंबई – लवकरच बाजारामध्ये २० आणि ५० रुपयांची नवी नोट दाखल होणार असून या नव्या नोटांच्या क्रमांकाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात येणार आहे. नव्या नोटेमध्ये क्रमांकाच्या मधोमध इंग्रजी अक्षर नसेल. बाजारात नवी नोट येणार असली तरी जुनी नोट चालणार असल्याची माहिती देखील भारतीय रिझर्व्ह बॅंकेनी दिली आहे. नव्या नोटेचे डिजाईन वेगळे असणार आहे. यासोबतच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

आरबीआयने नगदी रकमेचा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली असून म्हैसूर प्रिंटिंग प्रेस येथे स्टाफसोबत लष्कराचे २०० जवान तैनात करण्यात आले आहेत. आतापर्यंत वायुसेनेनी आरबीआय सेंटर्सवर २१० टनांच्या नोटा पोहचवल्या आहेत. भारतीय वायुसेनेच्या सी-१३०, सी-१७ आणि एन-३२ या विमानांची मदत घेऊन नोटा आरबीआय सेंटर्सवर पोहचविण्यात आल्या. सात डिसेंबरपर्यंत आरबीआय कॅश फ्लो वाढेल याकडे लक्ष देणार आहे. मोठ्या सॅलरी अकाउंटवाल्या बॅंकांना ३० टक्के अतिरिक्त रोख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चलनात नव्या २० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नोटा वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

Leave a Comment