आता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार ध्वनिप्रदूषणाची तक्रार

whatsapp
मुंबई: दिवसेंदिवस मुंबई शहर आणि उपनगरात वाढत चाललेल्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअॅप सेवा सुरु कऱण्यात आली आहे. नागरिक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषणाविरूद्ध तक्रार करू शकतात.

मोठमोठ्याने रस्त्यावर हॉर्न वाजवणे, लग्नसमारंभ अथवा इतर कार्यक्रमांत डीजेचा मोठा आवाज करणे, ढोल-ताशांचा आवाज अशा विविध तक्रारी नागरिकांना व्हॉट्सअॅपवरून करता येणार आहेत. नियंत्रण कक्षेतून यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप सेवा पोलीस नियंत्रण कक्षेशी जोडण्यात आल्यामुळे यावर पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्यात येईल. व्हॉट्सअॅप सेवेसाठी प्रादेशिक विभाग मध्य- ९८३३३४६१८२, पूर्व- ७०४५७५७२७२, पश्चिम- ९९८७०९३०६५, उत्तर- ९३०२१००१००, दक्षिण- ९८६९९३३५३६ या व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येणार आहे.

Leave a Comment