उर्जित पटेल यांना दरमाह २ लाख रुपये पगार

urjit-patel
मुंबई – आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांना दरमाह २ लाख रुपये पगार, दिमतीला दोन गाड्या आणि त्या चालवण्यासाठी दोन वाहनचालक या सुविधा दिल्या आहेत. मात्र उर्जित पटेल यांच्या घरी एकही मदतनीस नेमण्यात आलेला नाही अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे उर्जित पटेल यांनी स्वीकारली होती. यापूर्वी पटेल हे रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर होते. माहिती अधिकारा अंतर्गत पटेल यांना किती पगार मिळतो आणि त्यांना मिळणा-या सुविधा याविषयी माहिती मागवण्यात आली होती. आरबीआयने याला उत्तर दिले असून पटेल यांना सप्टेंबरमध्ये २ लाख ९ हजार रुपये ऐवढा पगार देण्यात आला होता अशी माहिती आरबीआयने दिली आहे. ऑगस्टमध्ये रघुराम राजन यांनादेखील इतकाच पगार देण्यात आला होता. पटेल यांच्या घरी मात्र एकही कर्मचारी नेमण्यात आलेला नाही असे आरबीआयने स्पष्ट केले. सध्या पटेल यांचा मुक्काम डेप्युटी गव्हर्नरपदासाठी दिलेल्या घरातच आहे.

Leave a Comment