जयचा तपास इंटरपोलकडे

jayt
ताडोबा व्याघ्र अभयारण्यातून सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला अभयारण्याची शान जय वाघाचा तपास इंटरपोल करणार असून या वाघाला शोधून देणार्‍यास अथवा त्याची माहिती देणार्‍यास ५० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे. जयच्या शोधासाठी शासनाने २०० कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र टीम नेमली असून ही टीम ३५० गावात जयचा रात्रंदिवस शोध घेत आहे. जयच्या गळ्यात असलेली रेङिओ कॉलर तुटक्या अवस्थेत सापडली होती.

केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे म्हणाले, जय मरण पावला असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत त्यामुळे तो जिवंत आहे असे गृहित धरूनच त्याचा शोध घेतला जात आहे. तस्करीसंदर्भातही तपास केला जात आहे. ८ एप्रिलला जय अचानक गायब झाला व त्याला शेवटचे पाहिले गेले तेव्हा तो शहरापासून ६० किमी अंतरावर आढळला होता. जय हा महाराष्ट्रातील अभयारण्यातला सर्वात मोठा वाघ असून तो सहा वर्षांचा आहे. त्याच्या शोधासाठी एनजीओ, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, पर्यटक तसेच गाईडही तपासकामात मदत करत आहेत. आसपासच्या गावातून त्याची पोस्टर लावली गेली आहेत.

Leave a Comment