सौराष्ट्रमध्ये भक्ती संगीत कार्यक्रमादरम्यान २ हजारांच्या नोटांची उधळण

note
अहमदाबाद : नव्या नोटांसाठी मिळविण्यासाठी अवघा देश रांगेत उभा असताना गुजरातच्या अहमदाबादमधील सौराष्ट्रमध्ये एका भक्ती संगीत कार्यक्रमादरम्यान चक्क २ हजारांच्या नव्या नोटांची उधळण केली आहे. सध्या सोशल मीडियात गायकावर २ हजार रुपयांच्या नोटा उधळल्याचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आहे.

हा कार्यक्रम अहमदाबादच्या सौराष्ट्रमध्ये नुकताच पार पडला. या कार्यक्रमात लोकांनी गायकावर चक्क २ हजारांच्या अनेक नोटा उधळल्या. लोक नोटांसाठी रांगेत उभे असताना नोटांच्या वर्षावाने गायकही भारावला आहे. आपल्यावर देवाची कृपा झाल्याचे लोक गायक कीर्तिदान गढवीने म्हटले आहे.

Leave a Comment