व्हॉल्वो’ची जगातील मोठी बस ब्राझीलच्या रस्त्यावर

volovo
रिओ: जगातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ‘व्हॉल्वो’ने जगातील सर्वात सर्वाधिक प्रवासी क्षमतेची बस ‘ग्रॅन आर्क्टीक ३००’ ही ‘फेट्रान्सरीओ’ या प्रदर्शनात प्रदर्शित केली. ही बस ब्राझीलमधील द्रुतगती बस वाहतूक मार्गांवर (बीआरटी) धावणार आहे.

या बसची लांबी तब्बल ३० मीटर असून प्रवासी क्षमता ३०० आहे. ही बस सध्या या मार्गांवर वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य आकार आणि क्षमतेच्या ३ बसेसची जागा घेऊ शकणार आहे. या बसच्या वापरामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक, सुरक्षित आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे; तर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थांच्या खर्चात कपात होणार असल्याने ती अधिक किफायतशीर ठरणार आहे; असा दावा कंपनीच्या लॅटीन अमेरिका विभागाचे प्रमुख फॅबियानो टोदेशचिनी यांनी केला आहे.

Leave a Comment