आयआयटी मुंबईच्या प्रांजल खरेला सव्वा कोटींचे पॅकेज

pranjal-khare
इंदोर – आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये इंदोर रहिवाशी असेलल्या आयआयटी मुंबईचा विद्यार्थी प्रांजल खरेला देशात सव्वा कोटींचे पॅकेज मिळाले आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करणाऱ्या प्रांजलला अमेरिकन कंपनी उबेरने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्लेसमेंट दिले आहे. एवढे मोठे पॅकेज मिळाल्यामुळे प्रांजलचे पालक खुपच खुश आहेत.

प्रांजलचा परिवार शहरातील मनोरमागंज परिसरात राहतात. त्याचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया सेंट्रल स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर प्रांजलने इंदोर येऊन आयआयटीची तयारी केली आणि मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला. दररोज आठ ते दहा तास अभ्यास करून आयआयटी जेईई परीक्षेत संपूर्ण देशात दहावा क्रमांक पटकवला होता, त्यानंतर आता त्याला हे यश मिळाले आहे.

Leave a Comment