३९ बायकांसह सुखाने नांदणारा जीओना

jiona1
भारत विविधतेने नटलेला देश आहे आणि ही विविधता किती प्रकारांत आहे याची गणती करणे कदाचित शक्यही नाही.एकत्र कुटुंबपद्धती हे भारताचे एक वैशिष्ठ मानले जाते.अर्थात जगातील सर्वात मोठे कुटुंब भारतातच आहे हेही खरे. या कुटुंबाला भेट द्यायची असेल तर थेट मिझोरामची राजधानी आयझॉलला जावे लागेल. जिओना नावाच्या माणसाच्या या कुटुंबात तब्बल १८१सदस्य आहेत आणि जिओना त्याचा पालनपोषण कर्ता आहे. या सदस्यात जिओनाच्या ३९ बायका, ९४ मुले, १४ सुना व ३३ नातवंडांचा समावेश आहे.

या एवढ्या मोठ्या फॅमिलीसाठी चार मजली इमारत असून त्यात १०० खोल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडे दोन बायका फजिती ऐका असे म्हटले जाते पण जिओनाचे कुटुंब त्यालाही अपवाद आहे. त्याच्या सर्व बायका गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. हे सारे कुटुंब अगदी आनंदी आहे व जिओनाला अजूनही कांही लग्ने करावीत अशी इच्छा आहे. ६७ वर्षीय जिओना उत्तम सुतारकाम करणारा आहे.

jiona
जिओनाने पहिले लग्न वयाच्या १७ व्या वर्षीच केले आहे. त्याची पहिली पत्नी घरात रोज सकाळी सगळ्यांना कामे वाटून देते. या कुटुंबाला खाण्यापिण्यासाठी लागणारी रोजची सामग्री आहे, ३० किलो चिकन, ६० किलो बटाटे, आणि १०० कि लो तांदूळ. जिओना म्हणतो मी अतिशय भाग्यवान आहे कारण मी ३९ महिलांचा पती आहे व जगात माझे कुटुंब सर्वात मोठे आहे.

Leave a Comment